23 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeलातूरउजेड येथे ४ एकर ऊस जळून खाक

उजेड येथे ४ एकर ऊस जळून खाक

शिरूर अनंतपाळ  : प्रतिनिधी
तालुक्यातील उजेड येथील शेतकरी भीमराव माधवराव खांडेकर यांच्या उजेड शिवारातील सर्वे नं. १०५  मधील ४ एकर २० गुंठे ऊस, पाईप व शेती उपयोगी साहित्य विद्युत लाईनच्या तारा तुटून शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. ही घटना दि.४ नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी घडली असून यात शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे.
      तालुक्यातील उजेड येथील शेतकरी भीमराव माधवराव खांडेकर यांची उजेड शिवारात सर्वे नं. १०५ मध्ये शेत जमीन असून या शेतीतून विद्युत वाहिनीची लाईन गेली आहे.त्यात सोमवारी दुपारी अचानक विद्युत वाहिनीचे तारा तुटून शॉर्टसर्किट झाल्याने आगीची ठिणगी ऊसाच्या फडात पडून लागलेल्या आगीत ४ एकर २० गुंठे ऊस, पाईप व शेती उपयोगी साहित्य जळाला आहे.  दरम्यान उजेड येथील भीमराव माधवराव खांडेकर यांनी आपल्या सर्वे नं.१०५ मधील ४ एकर २० गुंठे क्षेत्रात डिसेंबर २०२३ मध्ये नव्याने लागवड केली होती.
जोमात आलेले ऊसाचे पिक जळून खाक झाले व त्यात पाईप व शेती उपयोगी साहित्य जळाले आहे. तालुक्यातील उजेड येथील येथील सर्वे नं.१०५ मधील ४ एकर २० गुंठे जमीनील ऊसाला तारा तुटून शॉर्ट सर्किट मुळे आग लागली  आणि या क्षेत्रातील ऊस जळाला.अडचणीतील शेतक-यावर संकट आल्यामुळे ते हतबल झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी या शेतकरी भीमराव माधवराव खांडेकर यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR