परभणी : आजच्या आधुनिक काळात तरुण- तरुणींनी चांगले आदर्श घ्यावेत. आपल्या उणीवांना जो आपली ताकद बनवतो तोच जीवनात यशस्वी होतो हे सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.
भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सोपान महाराज कनेरकर व प्रा. विठ्ठल कांगणे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ. केदार खाटिंग, एन.डी. देशमुख, मनपा सदस्य मधुकर गव्हाणे, रितेश जैन, सुनील देशमुख, मोहन कुलकर्णी भाजपा परभणी महानगर सरचिटणीस कमलकिशोर अग्रवाल, संजय रिजवानी, प्रशांत सांगळे, ऋतुजा जोशी, टाकळी सरपंच सोपानराव सामाले, विधानसभा विस्तारक रामदास पवार, मंडळाध्यक्ष भालचंद्र गोरे, संदीप जाधव, संतोष जाधव, अजिंक्य औंढेकर, रमाताई शेजावे, सीमाताई धुमाळ, नंदापूरचे सरपंच वसंतराव रसाळ, उपसरपंच नांदापूर ज्ञानेश्वर लांडगे,
माजी सरपंच सुमित पाटील लांडगे, पारवा सरपंच संजय बेटकर, बाळासाहेब साबळे सावंगी माजी सरपंच गुलाबराव पंढरकर, वाडी दमई चे माजी सरपंच उद्धवराव गायकवाड, आकाश कदम जिल्हाउपाध्यक्ष विजय गायकवाड, उमेश शेळके, सुशील शर्मा, अक्षय डहाळे, हम्मूभाई चाऊस, मुकेश गाडे, ओम मुदीराज, सीमा धुमाळ, किशन सिंग टाक, माऊली कोपरे, बाबर भाई, राज निलावार, छायाताई मोगले, शुभम वायाळ, मनोज वाटोरे, पंडित, शहाणे, काजी, वाघमारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन वायकोस यांनी केले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी, शिक्षक वृंदांचा सत्कार करण्यात आला.