26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeसोलापूर'उत्तर'मधील गावांना निधी कमी पडू देणार नाही : खरे

‘उत्तर’मधील गावांना निधी कमी पडू देणार नाही : खरे

उत्तर सोलापूर-जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे यांच्यामुळे मी आमदार झालो, त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही. त्यांच्या कार्याचा वारसा जितेंद्र साठे यांनी पुढे चालू ठेवावा, असे सांगून वडाळा गावासह उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ गावांना विकासनिधी कधीच कमी पडू
देणार नसल्याची ग्वाही आमदार राजू खरे यांनी दिली. तर राजकीय आणि सामाजिक कार्यात साठे यांची साठ वर्षांची तपश्चर्या आहे. तेव्हा कोणीही त्यांच्याकडे पाठ फिरविण्याची घोडचूक करु नये, असा सल्लाही खरे यांनी दिला.

भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र साठे व जयदीप साठे यांचा वाढदिवसानिमित्त धाराशिवचे
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार खरे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे अध्यक्षस्थानी होते. ह.भ.प.दिगंबर फंड महाराज, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जी.एम. ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, बार्शीचे माजी सभापती युवराज काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचेतालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, प्राचार्य डॉ. शिरीष बोबडे, शशिकांत मार्तंडे, हृषीकेश बोबडे, शरद माने, सरपंच भारत माळी, मनोहर क्षीरसागर, उपसरपंच अनिल माळी, प्रभाकर गायकवाड, मनोज साठे, विकास गाडे, दत्तात्रय वीर, संतोष सुभेदार, पांडुरंग नागणे, शरद गायकवाड, रवी मोहिते, दिलीप जमदाडे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आमदार खरे म्हणाले, साठे यांची साठ वर्षांची तपश्चर्या पाठीशी आहे. त्यामुळे जितेंद्र साठे यांनी जनसेवेसाठी तत्पर राहावे. आपण सदैव सोबत राह असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत आघाडीचा उमेदवार म्हणून मला साठे यांनी केलेली मदत मी कधीच विसरु शकत नसल्याचे सांगून खासदार निंबाळकर म्हणाले, निष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण काका साठे आहेत. आता जितेंद्र साठे यांनी तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहावे, लहान भाऊ म्हणून मी सदैव पाठीशी राहीन. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यालय सरचिटणीस नागेश पवार यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत निचळ यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR