लखनौ : कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा फेपर फुटल्या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील हजारो उमेदवारांनी शुक्रवारी पोलिस भरती परीक्षा रद्द करून परीक्षा दुबार घेण्याची मागणी करत विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने केली होती. यावेळी पोलिसांनी निदर्शन करणा-या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी अनेक विद्यार्थीजखमी झाले होते. परिणामी उत्तर प्रदेशातील लोखो उमेदवारांनी डबल इंजिन सरकारवर जोरदार टीका केली होती, दरम्यान या उमेदवारांच्या आंदोलनाला यश मिळाले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येणा-या लोकसभेत भाजपला दगाफटका होऊ नये म्हणून कॉन्स्टेबल भरती परीक्षा रद्द करण्याची घोषणा शनिवारी केली.
दरम्यान राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रेतही या उमेदवारांनी आपली कैफियत राहुल गांधीकडे मांडली होती. आम्ही अनेक वर्षापासून परीक्षेचा अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली आहे. मात्र, परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे न अभ्यास केलेले उमेदवार पास होतील आणि नोकरी मिळवतील, मात्र, आम्ही दिवसरात्र अभ्यास करून ही आम्हाला यश मिळणार नाही तर अशा परीक्षेचा काय फायदा? असे उमेदवारांनी राहुल गांधींना सांगितले होते. यानंतर राहंल गांधींने विद्यार्थांना ‘मी तुमच्या पाठिशी उभा आहे तुम्हाला चिंता करू नका ’असे आश्वासन दिले होते, यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही शुक्रवारी योगी सरकारवर तोफ डागली होती,‘उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावात चर्चा आहे, की योगी सरकार झोपले आहे, देश मंगळ आणि चंद्रावर जात असताना योगी सरकारला निष्पक्षपने परीक्षा देखील घेत येत नाहीत’ असा हल्ला प्रियंका गांधी यांनी चढवला होता.
यामुळे योगी सरकार चांगलेच बॅकफुटवर आले असून, मुख्यमंत्री योनी यांनी पोलिस भरती परीक्षा रद्द करून सहा महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा घेतल्या जातील असे सांगितले. मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करून ही माहिती दिली. १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पोलिस भरती परीक्षेदरम्यान कृष्णनगर येथील शाळेत परीक्षार्थ्यां उमेदवार सत्य अनम कुमार याच्याकडे प्रश्नोत्तराच्या स्लिपवरून पेपर फुटण्याची भीती व्यक्त केली होती. यानंतर उमेदवारांनी प्रयागराज, लखनौ, आग्रा आदी शहरांमध्ये जोरदार निदर्शने केली होती.