24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरउदगीरच्या शौर्य दिनाला बगल; गौतमीच्या घुंगराचा खणखणाट

उदगीरच्या शौर्य दिनाला बगल; गौतमीच्या घुंगराचा खणखणाट

उदगीर : प्रतिनिधी
ऐतिहासीक, सांस्कृतीक व साहित्याचा वारसा लाभलेले उदगीरसाठी दि.३ फेबु्रवारी हा खास दिवस या दिवसी निजामाचा पराभव करून उदगीरचा किल्ला जिंकण्यात मराठ्यांना यश आले होते. हा दिवस विजय दिन, शौर्य दिन म्हणून साजरा केला जायचा पण अलिकडच्या काळात उदगीरकरांना याचा विसर पडला आहे. असे असतानाच याच दिवशी मात्र उदगीरात कातील आदा पहायला व गौतमीच्या घुंगराचा खणखणाट ऐकायला मिळाला. हे पाहून ऐकूण जो तो उदगीरची वाटचाल कोणत्या दिशेनी चालली आहे हेच कुजबुजत होता.
देशात उदगीर शहराची ऐतिहासिक शहर अशी ओळख आहे. याच उदगीरला सांस्कृतीक व साहित्याचा ही वारसा लाभला आहे. मराठे व निजाम यांच्यात झालेल्या लझाईत दि. ३ फेबु्रवारी १७६० रोजी मराठ्यांचे सेनापती सदाशिवरावभाऊ पेशवे यांनी निजामांचे ‘पाणिपत’ करीत त्याच्यावर विजय मिळवला. हा दिवस उदगीरकर विजयी दिन, शौर्य दिन म्हणून साजरा करीत होते. या लझाईला विजयला २५० वर्ष झाल्या निमित्ताने उदगीरची इतिहास प्रेमी, विचारवंत व उदगीर विकास परिषदेच्या पदाधिका-यांनी दि. ३  ३ फेबु्रवारी २०१० ते दि. ३ फेबु्रवारी २०११ असे वर्षभर उदगीर इतिहास वर्ष म्हणून मोठ्या दिमाखाने जोमाने साजरा केल्याचा इतिहास आहे.
आज तोच विजयदीन असताना उदगीरच्या ऐतिहासिक वारसाला काळीमा फासण्यात आला. या ऐतिहासिक दिनाचा विसर पडलेल्या भाजपाच्या पदासधिका-यांनी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर बहुचर्चित नृत्यंगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या विजयी दिनी उदगीरची तरणाई मात्र गौतमी पाटील यांच्या कातील आदांनी घायाळ झाल्याचे पाहीला मिळाले. हे पाहून जो तो ऐतिहासीक, सांस्कृतीक व साहित्याचा वारसा लाभलेल्या उदगीरची वाटचाल कोणत्या दिशेनी चालली आहे हेच कुजबुजत होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR