22.2 C
Latur
Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत !

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत !

चंद्रहार पाटलांकडून १०१ पुजा-यांच्या हस्ते महायज्ञ, बैलगाडी शर्यतीचाही थरार

सांगली : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे बैलगाडी शर्यतीच्या मैदानातच १०१ पुजा-यांच्या हस्ते महायज्ञ करणार आहेत.

अंबाबाई देवीची यात्रा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कवठेमहांकाळमध्ये रविवारी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीच्या मैदानातच महायज्ञ होणार असल्याने याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राज्य संघटक चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून उद्या बैलगाडी शर्यतीच्या मैदानातच १०१ पुजा-यांच्या हस्ते महायज्ञ करणार आहेत. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी या बैलगाडी शर्यतीच्या मैदानावरच १०१ पुजा-यांच्या उपस्थितीमध्ये महायज्ञ करणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : चंद्रहार पाटील
याबाबत चंद्रहार पाटील म्हणाले की, २९ तारखेला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे चार लाख शेतक-यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या स्पर्धेला आम्ही मुख्यमंत्री केसरी असे नाव दिलेले आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेच्या मनात उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत. जिथे आम्ही शर्यतीचे आयोजन करणार आहोत तिथेच आम्ही महायज्ञ करणार आहोत. उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. येणा-या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आम्ही महायज्ञाचे आयोजन केले आहे.

पहिले बक्षीस महिंद्रा थार
दरम्यान, अंबाबाई देवीची यात्रा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग गावच्या माळावरती बैलगाडी, घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री केसरी जनरल बैलगाडी, घोडागाडी, एकेरी घोडा स्पर्धेचा थरार उद्या पाहायला मिळणार आहे. देशिंग गावाच्या हद्दीत बोरगाव टोल नाक्याजवळ ही शर्यत होईल. बैलगाडी शर्यत मालकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली महिंद्राची थार गाडी ही विजेत्यासाठी आकर्षण असणार आहे. विजेत्यांचा गौरव थार गाडी देऊन केला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR