27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रउपोषण करून काहीही मिळत नाही

उपोषण करून काहीही मिळत नाही

पंकजा मुंडे यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका

बीड : भाजपच्या बीडमधील उमेदवार पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. सध्या अनेकजण उपोषण करत आहेत. पण उपोषण करून काहीही मिळत नाही, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी जरांगे यांचे नाव न घेता केली आहे.

त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जरांगे यांच्या उपोषण काळात त्यांना समर्थन देणा-या पंकजा यांनी अचानक यू-टर्न घेतल्यानंतर आता जरांगे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे या बीडमधून लढत आहेत. आज त्यांनी जाटनांदूर येथे जाहीर सभा घेतली. जाटनांदूर येथील त्यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मी कधीही वेगळं वक्तव्य केलं नाही. ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या अस्मितेची आहे. मला दिल्लीत जाण्याची हौस आहे म्हणून उमेदवारी मागितली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून उमेदवारी दिली आहे. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी ही माझी मागणी होती. पण कोअर कमिटीने माझं नाव घेतलं, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

कुणाची जात विचारली नाही
बीड जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती माझ्या दारावर आला असता मी कधीच त्याला त्याची जात विचारली नाही. प्रत्येकाला मी मदत करत आले. निवडणुकीत राजकारण आणण्याची गरज नाही, असे सांगतानाच नरेंद्र मोदी हे तिस-यांदा पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR