एकनाथ शिंदे २० वर्षात ९ वेळा नाराज, पोहोचले दरेगावात!

 

मुंबई : विशेष प्रतिनिधी
सन २००५ ते २०२५ या २० वर्षांच्या राजकीय कारकि­र्दीत एकनाथ शिंदे ९ वेळा नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वप्रथम ते २००५ मध्ये नाराज झाले होते. त्यांच्यावर २००५ साली शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर महापौर पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. तेव्हा महापौर पदाचा मान हा राजन विचारे यांना मिळाला होता.

सन २००६ साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर ठाणे जिल्हा संपर्क नेते ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी देसाई यांच्या या नियुक्तीने एकनाथ शिंदे हे नाराज झाले होते. त्यावेळी तेव्हाचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी २००७ ला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर देसाई यांची नियुक्ती रद्द केली. पुढे २००९ ला ठाणे आणि कल्याण असे शिवसेनेत दोन स्वतंत्र जिल्हाप्रमुख नेमण्यात आले. तेव्हा जिल्हाप्रमुखपदाच्या झालेल्या विभागणीवरना एकनाथ शिंदे हे नाराज होते.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती तुटली. त्यावेळी, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले. मात्र, अवघ्या एका महिन्यातच शिवसेना ही भाजपा बरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले. परंतु उपमुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते.

२०१९ मध्ये घडलेल्या राजकीय उलथा-पालथीमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राज्यात सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र, तेव्हा मुख्यमंत्री पदावर स्वत: खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे तेव्हा एकनाथ शिंदे हे नाराज होते.

२०२२ ला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना निवडणूक रणनीती पासून लांब ठेवण्यात आले. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढतच गेली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसानंतरच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्री एकनाथ शिंदे यांचे ऐतिहासिक असे बंड झाले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला किती जागा मिळाव्या यावरून चर्चा सुरू असताना देखील एकनाथ शिंदे शेवटपर्यंत १५ जागांसाठी अडून होते.

विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील जास्त जास्त जागा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे शेवटपर्यंत वाटाघाटी करतच होते. या दोन्ही निवडणुकांच्या जागा वाटपावरून शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. अनेक दिवस चर्चेत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पद तरी एकनाथ शिंदे स्वीकारणार का? याबाबत अगदी शपथ विधीच्या काही तास आधी पर्यंत शिंदे नाराज असल्याने उपस्थित राहणार नाहीत अशी चर्चा होती. मात्र, शेवटी ते उपस्थित राहिले आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या काळात ते अनेकवेळेस अचानक गावी जाऊन बसले. त्यामुळे त्यांची नाराज उघड होत होती.

पालकमंत्रीपदावरुन नाराजी
दरम्यान, आता पालकमंत्रीपदांच्या वाटपानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज झाल्यामुळे आपल्या दरे या मूळगावी गेले आहेत. तर, शिंदेंच्या नाराजीनंतर २ जिल्ह्यातील पालकमंत्रीपदांच्या नावांना स्थगिती देण्यात आली आहे. एकूणच, गेल्या १९ वर्षांतील राजकीय कार्यकाळात एकनाथ शिंदे ९ वेळा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54

Latest news