20 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रएक्झिट पोल फ्रॉड

एक्झिट पोल फ्रॉड

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक्झिट पोल फसवे असल्याचे म्हटले आहे आणि दावा केला आहे की महाविकास आघाडी २६ तारखेला सत्तेत येईल. त्यांनी २३ तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा दावा करण्याची घोषणा केली आहे. राऊत यांनी भाजप आणि मिंधे गटावर निवडणुकीत पैशाचा वापर करण्याचा आरोप केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले. मागील वर्षीपेक्षा मतदानामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी एक्झिट पोल फ्रॉड असल्याचे म्हणत २३ तारखेला महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव सांगणार असल्याचे म्हटले आहे.

हरियाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा जिंकेल असा पोल होता. काय झालं आपण पाहिलं. लोकसभेला ४०० पार अशा प्रकारची एक्झिट पोल तयार करून घेतले होते काय झाले आपण पाहिले. लोकांनी मतदान केलं आहे, मतदान गुप्त असतं हे सगळ्यांना माहीत आहे तरी काही लोक गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. महाविकास आघाडी महाराष्ट्रात २६ तारखेला सत्तेवर येते. २३ ला निकाल लागेल. २६ ला सरकार स्थापन करू. २३ तारखेला संध्याकाळी आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा एकत्रित निवडून येत आहेत त्याच्यामुळे या पोलवर कोणी विश्वास ठेवू नये. हे भारतीय जनता पक्ष मिंधे गट यांचे फार मोठे षडयंत्र आहे. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR