25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरएक लाख लोकसंख्येला ३७ टँकरने पाणी

एक लाख लोकसंख्येला ३७ टँकरने पाणी

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयास वैशाखाचा ऊन, वारा, पावसाचा तडाखा सहन करण्याच्या बरोबरच ४९९ गावे, वाडयावरील जनतेला तीव्र पाणी टंचाईच्या झळाही सोसाव्या लागत आहेत. जिल्हयात आज घडीला २९ गावे, ११ वाडया, तांडे, वस्त्यावरील १ लाख १ हजार ११६ नागरीकांना ३७ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. पाणी टंचाईची तीव्रता आणखी महिनाभर वाढतीच राहणार आहे.
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी झालेल्या सरासरी पेक्षा कमी पावसामुळे यावर्षी वाढत्या कडक उन्हामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हयातील ४२ गावे व २३ वाडया, तांडयावरून ६५ टँकरची मागणी पंचायत समिती स्तरावर केली आहे. पंचायत समिती स्तरावरून आलेल्या प्रस्तावांची पाहणी करून ३२ गावे व १३ वाडयांचे ४५ टँकरचे प्रस्ताव तहसील कार्यालय स्तरावर पाठवले होते. तहसीलने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे टँकरचे प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी २९ गावे व ११ वाडयांसाठी ३७ टँकर मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच पाणी टंचाई जाणवणा-या ग्रामपंचायतींनी ४२० गावांसाठी, ७९ वाडयांसाठी ७३२ अधिग्रहणाद्वारे नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे पाठवले होते.  सदर प्रस्तावांची पाहणी करून पंचायत समिती स्तरावरून तहसिल कार्यालयाकडे ३९१ गावे, ६५ वाडयांना ५९९ अधिग्रहणाची गरज असल्याचे कळवण्यात आले होते. त्यानुसार तहसिल कार्यालयांनी पाहणी करून ३३८ गावे, ५६ वाडयांना ४८० अधिग्रहण मंजूर केले आहेत. त्या अधिग्रहणाद्वारे गावे, वाडयांना अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR