29.1 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeलातूरएफएसटी पथकाने २७ नेत्यांच्या बॅग तपासल्या

एफएसटी पथकाने २७ नेत्यांच्या बॅग तपासल्या

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. लातूर विमानतळावर उमेदवारांच्या प्रचारार्थ २७ नेते दि. १६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत उतरले. कांही नेते विमानाने, तर कांही हेलिकॉप्टरने आले व गेले. या नेत्यांच्या बॅगा एफएसटी पथकाने तपासल्या. लातूर विमान तळावर उतरलेले नेते सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, उदगीर, निलंगा आदी ठिकाणी प्रचारासाठी गेले होते. तसेच एका नेत्याच्या तब्बल ११ बॅग असल्याने त्या तपासण्यासाठी एफएसटी पथका अर्धा तास लागला होता. यावेळी आचारसंहिता प्रमुख तुकाराम भालके, एफएसटी पथकाचे प्रमोद हुडगे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR