कोल्हापूर : प्रतिनिधी
मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत विचारण्यात आले. जेव्हा त्यांनी संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी पहिली मागणी कोणी केली असेल तर मी केली होती असे या प्रकरणी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गावगुंडांकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेला घडून १५ दिवस झाले असून या प्रकरणातील सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु, या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशी चर्चा असलेल्या वाल्मीक कराडला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या वाल्मीक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत सलोख्याचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेनंतर मुंडे यांचीही सर्वत्र चर्चा रंगली आहे.
परंतु, याबाबत बीडमधील विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मोठे विधान केले आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी कोल्हापुरात महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत म्हणाल्या की, मी महालक्ष्मी मंदिराच्या पवित्र दारात उभी आहे. त्यामुळे खोटं बोलणार नाही किंवा इतरत्र कुठेही असले तरी खोटं बोलणार नाही.
संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी पहिली मागणी कोणी केली असेल तर मी केली होती. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी गोपीनाथ गडावरून ही मागणी मी केली होती. त्यामुळे त्या क्रूर प्रकरणाचा तीव्र संताप आणि निषेध मी व्यक्त केला आहे. पण आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी दोन्ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याने ते या प्रकरणात जातीने लक्ष घालून या प्रकरणात न्याय भूमिका घेऊन माझ्या लेकराला न्याय देतील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
संतोष माझा बूथ प्रमुख
संतोष देशमुख हा माझा बूथ प्रमुख होता. त्याने माझ्यासोबत काम केले आहे. एक चांगला सरपंच म्हणून त्याने काम केले आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या घरच्यांना न्याय देईल, असेही यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
















