23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी बसचे ब्रेक फेल, पाच वाहनांना उडविले

एसटी बसचे ब्रेक फेल, पाच वाहनांना उडविले

छत्रपती संभाजीनगर : प्रवासी घेऊन निघालेल्या एसटी बसचे ब्रेक फेल होऊन बस अनियंत्रित झाली. बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता मिल कॉर्नर चौकात ही घटना घडली.

एसटी महामंडळाची छत्रपती संभाजीनगर ते दिगाव बस (एम.एच. २Þ०-बी. एल. २३२१) चालक सायंकाळी प्रवासी घेऊन बसस्थानकामधून बाहेर पडला. मिल कॉर्नर चौकात सिग्नल सुटताच बस अनियंत्रित झाली व बसने समोरील एका कारला धडक दिली. बस व कारच्या जोराच्या धडकेने समोरील दोन रिक्षा, दोन दुचाकींना धडक बसून वाहनांचे मोठे नुकसान झाले.

वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR