38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयओडिशात युती फिस्कटली

ओडिशात युती फिस्कटली

भाजपसोबत युती न करण्याचा बीजेडीचा निर्णय

भुवनेश्वर : वृत्तसंस्था
भुवनेश्वर आणि दिल्लीत अनेक चर्चा झाल्यानंतर ओडिशामध्ये बीजेडी आणि भाजपने युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ओडिशाचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी २१ लोकसभा मतदारसंघ आणि १४७ विधानसभेच्या जागा भाजप स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली.

सामल यांनी नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडीने केंद्रातील भाजप सरकारला महत्त्वाच्या क्षणी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. परंतु ओडिशा लोकांच्या हितसंबंधित अनेक मुद्यांवर भाजप बीजेडी सरकारशी सहमत नाही, असे सांगितले. बीजेडीकडून समल यांच्या विधानावर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, ते स्वबळावर लढण्यास तयार आहेत.

भाजप आणि बीजेडीच्या विधानसभेच्या जागावाटपाच्या मुद्यावरून बोलणी फिस्कटली. बीजेडीला १४७ पैकी १०० पेक्षा कमी विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवायची नव्हती, ज्या राज्यात त्यांची उपस्थिती आहे. मात्र भाजपने जवळपास ५७ जागांवर आग्रह धरला. निवडणुकीनंतरच्या सत्तेच्या वाटणीच्या सूत्रावरही पक्षांचे एकमत होऊ शकले नाही, असे सूत्रांनी सांगितले. बीजेडीच्या काही बंडखोर नेत्यांना निवडणुकीत उतरवण्याची भाजपची योजनाही बीजेडीला फारशी पटली नाही. त्यातूनच युती फिस्कटली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR