17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरऔद्योगिक रसायनशास्त्र विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन

औद्योगिक रसायनशास्त्र विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी
येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील औद्योगिक रसायनशास्त्र व रसायनशास्त्र विभागातर्फे दि. ३१ ऑगस्ट रोजी औद्योगिक रसायनशास्त्र विद्यार्थी मंडळाचे उद्घाटन करण्यात आले व करिअर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस अँड फ्युमिगेशनचे संचालक व लातूर रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीमंत कावळे व लातूर येथील जिल्हा परिषदेचे अप्पर कोषागार अधिकारी नागेश बुद्धिवंत, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर, औद्योगिक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आण्णाराव चौगुले, विभाग समन्वयक डॉ. जे. ए. अंगुलवार, प्रा. राहुल जाधव, औद्योगिक रसायनशास्त्र विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष अभय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी श्रीमंत कावळे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वत:चा व्यवसाय कसा उभारता येईल यावर भर द्यावे आणि महाभारतातील अर्जुनाप्रमाणे ध्येयाशी एकनिष्ठ राहून ध्येय साध्य करावे असे सांगितले तर नागेश बुद्धिवंत यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल, व्हाट्सअप व फेसबूक यापासून दूर राहून स्वत:च्या क्षमतेला ओळखून करिअर घडावे असे त्यांनी सांगितले. डॉ.आण्णाराव चौगुले यांनी औद्योगिक रसायनशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना औद्योगिक कंपन्यांमध्ये भरपूर संधी आहेत, त्या संधीचे सोने करावे असे सांगितले. डॉ.युवराज सारणीकर यांनी विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाचे जास्तीत-जास्त ज्ञान अद्ययावत करून जीवनात शिस्तशिर व प्रामाणिक राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बल्लाळे यांनी विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य वृंिद्धगत करून भावी आयुष्य उज्ज्वल करावे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गोरे व साक्षी पाटील यांनी संयुक्तरित्या केले तर आभार प्रा. राहुल जाधव यांनी मानले. याप्रसंगी डॉ. ईन्नूस पठाण, प्रा. नवनाथ ढेकणे, राम बिर्ले, बापू जंगम, रवी बाजपाई, मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश जाधव, सदस्य अंकिता जाधव, सायली क्षीरसागर, आदर्श माने यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR