36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeलातूरऔसा शहरात वॉल लिकेजमुळे लाखो लिटर पाणी वाया

औसा शहरात वॉल लिकेजमुळे लाखो लिटर पाणी वाया

औसा : प्रतिनिधी औसा शहरात पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे व वॉल लिकेजमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. लिकेज झालेला मुख्य वॉल दुरुस्त करुन वाया जात असलेले लाखो लिटर पाणी थांबवा व शहरातील मुख्य सर्व गटारी स्वच्छ करुन पथदिवे  सुरळीत करावेत या मागणीचे निवेदन एमआयएमच्या वतीने मुख्याधिका-यांना निवेदन देण्यात आले.
औसा शहरात मुख्य ठिकाणी अनेक जागी पाणी पुरवठ्याचे  वॉल लिकेज झाले आहेत. ज्यामुळे लाखे लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे नागरीकांना शहरात पाणी मिळत नाही व विनाकारण पाणी वाया जात असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच सद्या पावसाळ्याचे दिवस असून या पावसाळ्याात अधिक पाऊस पडून शहरातील  नागरीकांच्या घरामध्ये पाणी घुसून जिवनावश्क वस्तूचे नुकसान झाले आहे. कांहीच्या दुकानात पाणी शिरुन नुकसान झाले आहे. शहरातील सर्वच नाल्या तुडूंब भरल्या आहेत. त्याची लवकर सफाई कारण्यात यावी. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरील लाईट बंद असून यामुळे रात्री चो-या होण्याची शक्यता वाढली आहे. मोकाट कुत्रे, लाईट बंद असल्यामुळे नागरीकांचा चावा घेत आहेत.
याबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही त्याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. याबाबत गंभीरतेने लक्ष देऊन कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा एमआयएमच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एम औसाचे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिका-यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR