26.4 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकंटेनर ट्रक उलटल्यामुळे कारमधील ६ जण मृत्युमुखी

कंटेनर ट्रक उलटल्यामुळे कारमधील ६ जण मृत्युमुखी

सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला.

अपघातातील मृत कुटुंब हे सांगलीच्या जत तालुक्यातील असून गावावर शोककळा पसरली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळुरुवरुन जतला ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कारवर उलटल्यामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली. ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्याने इप्पाळगोळ हे कुटुंब आपल्या गावाकडे येत होते. त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कारवर उलटल्यामुळे चंद्रम इगाप्पागोळ, पत्नी धोराबाई, मुलगा गण, मुलगी दिक्षा, आर्या, चंद्रम इगाप्पागोळ यांच्या भावाची पत्नी विजयालक्ष्मी यांचे देखील निधन झाले.

चंद्रम इप्पाळगोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते, या दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण कुटुंबच मृत्यूमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ३ महिन्यांपूर्वीच इग्गाप्पागोळ यांनी कार खरेदी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR