22.8 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeलातूरकदम यांनी केले दिव्यांग मुलीचे कन्यादान

कदम यांनी केले दिव्यांग मुलीचे कन्यादान

रेणापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम यांनी सामाजिक बांधिलकी जपत रेणापूर शहरातील सुमन संतराम गायकवाड या दिव्यांग असलेल्या मुलीचे मानपान व रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून देत कन्यादान केले.
रेणापूर शहरातील कुडके वस्तीतील संतराम हरिबा गायकवाड हे मजुरी करून उपजिविका भागवतात. त्यांना पत्नी , चार मुली व एक मुलगा असून त्यापैकी दोन मुली व मुलगा हे दिव्यांग आहेत . दोन मुली पैकी  सुमन या दिव्यांग मुलीचे १० वीपर्यंत शिक्षण झाले . आपल्या मुलीचे लग्नाचे वय झाल्याने व आपल्या मुलगी दिव्यांग असल्याने तिच्या सोबत कोण लग्न करणार अशी वडील संतराम यांना चिंंता होती. शहरातीलच सामाजिक कार्यकर्ते भानुदास कुडके यांना संतराम यांची सर्व परिस्थिीती माहीत असल्याने त्यांनी सुमन यांचे स्थळासाठी शोध सुरु केला. माजलगाव ( जि. बीड ) तालुक्यातील दिंद्रुड येथे १२ वीपर्यंत शिक्षण घेतलेला व टेलंिरगंचे काम करणारा सचिन रमेश लोखंडे हाही मुलगा दिव्यांग असल्याची व तेही वधूच्या शोधात असल्याची माहिती कुडके व संतराम गायकवाड यांना मिळाली.
मुलाचे वडीलांशी संपर्क साधून मुलगी पाहण्याचे निमत्रण दिले. रेणापूर येथे येऊन सुमन हिस पसंद केले आणि दोघांची लग्नाची बोलणीही झाली मात्र हालाकीच्या स्थितीमुळे मुलीचे लग्न कसे करावे असा प्रश्न पडला. याची माहिती माहिती सामाजिक कार्यकर्ते भानुदास कुडके यांना सुमनचे वडील संतराम यांनी सांगितली तर कुडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम यांच्याशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर बालाजी कदम यांनी सुमनच्या लग्नाची सर्व जाबाबदारी घेत कन्यादान करण्याची हमी दिली .
 त्यानुसार शुकवारी १४ जून रोजी शहरातील कुडके गल्लीतील  श्रीकृष्ण व नामदेव मंदिर येथे सुमन व सचिन या दिव्यांग वधू-वरांचा मानापणासह रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला . या विवाहात बालाजी कदम यांनी मणी, मंगळसूत्र , जोडवे तसेच संसारोपयोगी साहित्य व मंडप, वाजतंत्री, ४०० व-हाडी  मंडळीच्या भोजनाची सोय केली. याबद्दल बालाजी कदम यांचे रेणापूर पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.  या विवाहप्रसंगी बालाजी कदम, भानुदास घोडके, निखिल कातळे, गोंिवद येलंफळे ,बापू पवार ,महेश कातळे यांच्यासह गायकवाड व लोखंडे परिवारातील नातेवाईक मंडळी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR