21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमुख्य बातम्याकर्मचा-यांकडून बनावट बिलाद्वारे १,०७० कोटींची करचोरी!

कर्मचा-यांकडून बनावट बिलाद्वारे १,०७० कोटींची करचोरी!

९० हजार कर्मचा-यांवर कारवाईची शक्यता

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात खोटे परतावा दावे करणा-या कर्मचा-यांबाबत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. खाजगी क्षेत्रात काम करणा-या ९०,००० पगारदार करदात्यांनी १,०७० कोटी रुपयांचे चुकीचे कर दावे केल्याचे उघड झालं आहे.

सुमारे ९० हजार पगारदार कर्मचा-यांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत चुकीच्या कर कपातीच्या दाव्यांमधून १,०७० कोटी रुपये मिळवले आहेत. अशा लोकांनी चुकीच्या पद्धतीने कर कपातीचे दावे केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

आयकर विभागाने केलेल्या वेगवेगळ्या शोध, जप्ती आणि सर्वेक्षण ऑपरेशन्स दरम्यान ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कर्मचा-यांनी इन्कम टॅक्स रिटर्नच्या कलम ८०सी, ८०डी, ८०इ, ८०जी, ८०जीजीसी, ८०जीजीबी अंतर्गत चुकीच्या कर कपातीचा दावा करून त्यांचे कर लाभ घेतले आहेत. असे लोक सार्वजनिक क्षेत्रातील, मल्टी नॅशनल आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसह विविध क्षेत्रात काम करणा-या संस्थांचे कर्मचारी असल्याचे समोर आलं आहे.

करकपातीचे असे दावे करणारे बहुतेक लोक एकाच कंपनीत काम करत होते. आयकर विभागाच्या तपासात आणखी एक घोटाळा समोर आला आहे. आयटीआरच्या कलम ८०जीजीबी/८०जीजीसी अंतर्गत करदात्यांनी दावा केलेल्या आयटीआरमध्ये दाखवलेल्या एकूण पावत्यांमध्ये मोठा फरक आढळला आहे. इतकेच नाही तर कलम ८०सी, ८०इ, ८०जी अंतर्गत केलेले दावे देखील संशयास्पद असल्याचे दिसून आलं आहे.

टीडीएसचा दावा करणा-या अशा कर्मचा-यांची ओळख पटली आहे. कर विभाग कलम ८०इ, ८०जी, ८०जीजीए, ८०जीजीसी आणि इतर कपाती अंतर्गत बनावट कपातीचा दावा करत असल्याचा संशय असलेल्या जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधणार आहे. काही लोकांनी चुकीच्या कपाती/परताव्याचा दावा करून करदात्यांची दिशाभूल केल्याचे तपासात समोर आले आहे, असं अधिका-यांचे म्हणणं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR