38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeलातूरकाँग्रेसचा विचार तेवत ठेवण्याचे काम चाकूरने केले

काँग्रेसचा विचार तेवत ठेवण्याचे काम चाकूरने केले

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेसचा पक्षाचा विचार नेहमीच तेवत ठेवण्याचे काम चाकूरने केले आहे. यामुळे चाकूर हे काँग्रेसचे मूळ आहे, चाकूरचे काँग्रेस पक्षाचे काम प्रेरणादायी राहिले आहे. देशात लोकसभेची निवडणूक ही एनडीए विरुद्ध इंडिया होत आहे तर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होत आहे. यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. बुधवार, दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी लातूर-नांदेड रोडवरील जुना बस स्टॅण्ड चाकूर येथे महाविकास आघाडीतील पदाधिका-यांशी संवाद साधून महाविकास आघाडीचे लातूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे
यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या वेळी काँग्रेसचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, चाकूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास पाटील चाकूरकर, एन. आर. पाटील, चंद्रकांत मद्दे, निलेश देशमुख, नीलकंठ मिरकले, अनिल चव्हाण, पप्पू  शेख आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, काँग्रेसचा विचार नेहमीच तेवत ठेवण्याचे काम चाकूरने केले आहे. देशात लोकसभेची निवडणूक ही एनडीए विरुद्ध इंडिया होत आहे तर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होत आहे, हा वैचारिक लढा आपण देश, राज्य, जिल्हा वाचविण्यासाठी लढत आहोत, असे ते म्हणाले.
या विद्यमान सत्तेला आपल्याला पराभूत करायचे आहे. सध्याचे भाजप खासदार हे चाकूर तालुक्याचे आहेत; पण ते लातूर लोकसभा मतदारसंघातील देवणी, लोहा, कंधार तालुक्यांत आतापर्यंत फिरकलेच नाहीत. कंत्राटदार उमेदवाराविरुद्ध डॉक्टर उमेदवार, अशी लातूर लोकसभेची लढत होत आहे. लातूरच्या राजकारणाची उज्ज्वल परंपरा आहे. यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR