20.2 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeलातूरकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची आज लातूर, रेणापूर व निलंगा येथे सभा 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची आज लातूर, रेणापूर व निलंगा येथे सभा 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सभा आज दि. ८ नोव्हेंबर रोजी लातूर शहर, रेणापूर व निलंगा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक रामहरी रुपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे व शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काँंग्रेस भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस माजी महापौर अ‍ॅड. दीपक सुळ, माजी उपमहापौर कैलास कांबळे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर, व्यंकटेश पुरी, प्रविण सूर्यवंशी, राम गोरड आदी उपस्थित होते. निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँगे्रस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ आज दुपारी २ वाजता निलंगा, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर शहरातील गंजगोलाई परिसरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या परिसरात दुपारी ४ वाजता तर काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीणचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ रेणापूर येथे सायंकाळी ७ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची सभा होणार आहे.
या सभांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे सेलचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार धिरज विलासराव देशमुख उपसिथत राहणार आहेत. निलंगा, लातूर व रेणापूर येथे होणा-या या सभांना मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR