सुलतानपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज अमित शहा यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्या प्रकरणी मानहानीच्या खटल्यात सुलतानपूर खासदार-आमदार न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांनी न्यायालयासमोर आपला जबाब नोंदवला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आजपर्यंत त्यांनी कधीही कोणाच्या विरोधात असे वक्तव्य केलेले नाही ज्यामुळे मानहानीचा गुन्हा दाखल होऊ शकेल. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.
राहुल गांधींचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी सांगितले की, विशेष न्यायाधीश शुभम वर्मा यांच्यासमोर राहुल गांधी म्हणाले की, माझ्याविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार असून, फिर्यादीच्या वकिलामार्फत पुरावे सादर केले जातील.