लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेत मागच्या ४ ते ५ वर्षात ज्या पध्दतीने कामांना मंजूरीच्या पूर्वी वर्क ऑर्डर दिली जात होती. आगदी त्याच पध्दतीने सध्या कामे सुरू आहेत. अशा कारभारला आळा घालने तर सोडच जि. प. अधिका-यांनाच पदाधिकारी पाठीशी घालत आहेत. हा कामाचा चुकीचा पायंडा पडत आहे. हे ७ पैकी एकाच कामाला रितसर मंजरी दिली, तर इतर कामांना मंजूरी नंतर घेतली जात आहे, हे यावरून सिध्द होत असल्याचा आरोप जि. प. काँग्रेसच्या गट नेत्या अशाताई भिसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दर्जेदार व नियमानुसार कामे होणे अपेक्षित आहेत. रितसर कामांच्या ऐवजी आदी काम करा, मग वर्क ऑर्डर घेऊ, ही पध्दत चुकीची आहे. या संदर्भाने सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न सुध्द विचारू दिले नाहीत. सभा तहकूब झाली. प्रश्नच मांडू देत नसाल तर कशाला बसायचे म्हणून स्थायी समिती सदस्य सुभाष पवार, सोनाली थोरमोठे आणि मी सभागृह सोडून बाहेर पडलो. लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या विस्तार अधिका-यांचा पगार शासनाने का रोखून धरला, त्यांचे पद आज घडीला कशामुळे धोक्यात आणले, यावर कांहीच उत्तर मिळाले नाही. लातूर जिल्हा परिषदेत चुकीच्या कामांना व चुकीचे काम करणा-या अधिका-यांनी सत्ताधा-यांनी पाठीशी घालू नये, असे भिसे यांनी सांगीतले. यावेळी स्थायी समिती सदस्य सुभाष पवार, सोनाली थोरमोठे, महादेव मस्के, सई गोरे आदी उपस्थित होते.
७ पैकी एकाच कामाला रितसर मंजुरी
लातूर जिल्हा परिषदेने ७ कामांना आगोदर कार्यारंभ आदेश दिला, मग मंजूरी देण्याचा घाट घातला. यात एका कामाचा अपवाद आहे. यात प्रा. आ. केंद्र येरोळ ९८ लाख ९६ हजार २५९ रूपयांचे काम, विमानतळ ते रा. मा. ८७ लाख ३८ हजार २६२ रूपये, प्र.जि.मा. २६ ते गादगेवाडी, तसेच कुमठा बू.-बाभळदरा ९९ लाख ६ं७ हजार १६२, महादेव मंदिर शिरूर ताजबंद ७६ लाख ८१ हजार ९७८, भादा जि. प.शाळ ८४ लाख ७८ हजार ४४७, दर्जी बोरगाव आयुर्वेदिक दवाखना ७२ लाख ९६ हजार ५७० ही ५ कोटी २० लाख ५८ हजार ६७८ रूपयांच्या कामांना मंजूरीपूर्वीच वर्क ऑर्डर झाली. तर ग्रा. मा. ८६ गारमेट रा. मा. २३६ रस्ता ७२ लाख २ हजार ८१३ रूपयांचे एकमेव कामाला रितसर मंजूरी मिळाल्याचे भिसे यांनी सांगीतले.
मंडप, दिवे, स्टेज लावणे व काढण्याचा वेगवेगळा अजब खर्च
लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळयाच्या आनावरण कार्यक्रमात मंडप, दिवे, स्टेज लावणे यासाठी वेगळा खर्च आणि ते काढण्यासाठी वेगळा आणि आजब खर्च, असाच प्रकार नमो रोजगार मेळाव्यातही झाला. यावर १ कोटी ६० लाख रूपयांचा अनावश्यक खर्च केला गेला. विशेष म्हणजे एवढा खर्च करून पुतळा उभारल्यानंतर त्या परिसराची देभाल, स्वच्छता नाही. लावलेल्या झाडांना पाणी नाही, अशी दुरावस्था झाली आहे. हा विषय स्थायी समितीच्या सभागृहात मांडू न दिल्यामुळे येथे मांडावा लागत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सर्व सामान्यांसाठी अतिशय चांगले काम केले आहे. त्यांच्या विषयी आमची आदराची भावना असल्यानेच हा विषय महत्वाचा आहे.
पुतळा उभारण्याच्या निविदेतही अनागोंदी
लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारण्यासाठी बांधकाम विभागाने निविदा मागविल्या होत्या. यात मे. म्हेत्रे डेकोरेटर्स, अहमदनगर यांनी १ कोटी ६० लाख ७१ हजार ९०७ तर मे. ड्रिम रिफलेक्शन इव्हेंटस अॅन्डंटरटेनमेंट, लातूर यांनी १ कोटी ६० लाख ७१ हजार ९०७ रूपयांची आणखी एक निविदा अशा तिन निविदा आल्या होत्या. यात सर्वात कमी रक्कमेची आलेली निविदा डावलून जि. प. बांधकाम विभागाने उच्च बोलीची निविदा मान्य केली. असे का आणि कशासाठी केले, असा प्रश्न निर्माण झाल्याचे भिसे यांनी सांगीतले.
















