यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या (एसएससी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. ८ मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातून दहावीच्या निकालात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे. मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी आहे. यंदा दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७. ६२ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर च कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व त्यांची एकूण उत्त्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ आहे. राज्यातून ६ हजार ६१२ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ४ लाख ८२ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे.

राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक ८२ कॉपीचे प्रकरण उघडकीस आली आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ७१ अमरावती ६७, नागपूर ४६, मुंबई ४४ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत तर लातूर आणि पुण्यात ४२ तर कोल्हापूर आणि कोकण विभागात ४ प्रकरणे समोर आली आहेत.

विभागनिहाय टक्केवारी
कोकण:९७.६२ टक्के
पुणे: ९४.२४ टक्के
नागपूर: ८९.०७ टक्के
मुंबई: ९४.९७ टक्के
कोल्हापूर: ९५.४७ टक्के
अमरावती: ९०.५० टक्के
नाशिक: ९०.५३ टक्के
लातूर: ८८.४२ टक्के
छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के
राज्यात एकूण ४०२ कॉपीचे प्रकार

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

मी सांगून काटा काढतोय

पुणे : मी एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर काढतो. मी...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उलटी हलगी आंदोलन
03:32
Video thumbnail
हिमायतनगर तहसीलसमोर शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण; तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली
02:55
Video thumbnail
Latur|शेतकऱ्याची नजर पडली अन् हरणाचा जीव वाचला; वनविभागाचं रेस्क्यू ऑपरेशन
01:18
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
02:36
Video thumbnail
Latur|CCTV फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपी अटकेत; ठाकरे चौकातील हल्ल्याचा पोलिसांनी लावला छडा
01:57
Video thumbnail
Maharashtra Drought 2026 | 265 तालुके दुष्काळग्रस्त | शेतकऱ्यांना मदत कधी? | मुद्दा महाराष्ट्राचा
57:19
Video thumbnail
कोयता गँगची दहशत पुन्हा? दोन विद्यार्थी जखमीविद्यार्थ्यांवर हल्ला अन् CCTV मध्ये थरार; लातुरात खळबळ
00:33
Video thumbnail
Latur|पाककलेतून आरोग्याचा संदेश; ६९ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
04:15
Video thumbnail
Latur|७ गाड्या, ४० जवान, दीड लाख लिटर पाणी; अखेर आगीवर नियंत्रण
03:57
Video thumbnail
Latur|१३ तासांची झुंज! अखेर सक्रॅप मार्केटमधील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
01:42
Video thumbnail
Dharashiv|हातातोंडाशी आलेला घासही जळाला; तेरमध्ये शेतकऱ्यावर दुहेरी संकट
02:39
Video thumbnail
Dharashiv|डोळ्यांसमोर पीक करपलं; अखेर शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटावेटर!
03:46
Video thumbnail
Ashok Chavan Audio Clip Viral|दोन दिवस शांत राहा, शिव्या खा!” अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओने खळबळ
00:58
Video thumbnail
वडगाव हातकणंगले महामार्गावरील भीषण अपघात CCTV कॅमेरात कैद. #marathinews #breakingnews
00:25
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळाचा आणखी एक बळी? अहमदपूरमध्ये ६० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
02:32

Latest news