33.3 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeलातूरकिसान व फॅशन संस्कृतीचा मॉलच्या माध्यमातून मिलाप : खानविलकर

किसान व फॅशन संस्कृतीचा मॉलच्या माध्यमातून मिलाप : खानविलकर

लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या पहिल्या फॅमिली किसान फॅशन मॉलचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात रविवार दि. ९ मार्च रोजी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना किसान व फॅशन संस्कृतीचा या मॉलच्या माध्यमातून मिलाप साधण्यात आला असून किसान फॅशन मॉल नक्कीच लातूरकरांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.
लातूरातील सुभाष चौक परिसरातील दयाराम रोडवरती मराठवाड्यातील सर्वात मोठ्या पहिल्या फॅमिली किसान फॅशन मॉलचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात रविवार दि. ९ मार्च रोजी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी किसान मॉलचे सर्वेसर्वा तेलंगणाचे आमदार धनपाल सुर्यनारायण गुप्ता, माजी आ. शिवाजीपाटील कव्हेकर, डॉ. अर्चनाताई चाकूरकर, अजित पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी किसान फॅशन मॉलच्या या बाराव्या षाखेचा शुभारंभ करताना मला मनस्वी आनंद होत असून किसान फॅशन मॉलच्या संचालकांनी किसान व फॅशन संस्कृतीचा या मॉलच्या माध्यमातून मिलाप साधला असून या मॉल मध्ये ९९ रूपया पासून ते ८० हजार रूपया पर्यंतची सर्वांच्या पसंतीस उतरतील अशी वस्त्रे ड्रेस साड्या उपल्बध्द करून देण्यात आले असून हा मॉल लातूरकरांच्या नक्कीच पंसतीस उतरेल असा विश्वास व्यकत करत पुढील वाटचाली शुभेच्या दिल्या तर उपस्थितांनी ही आपल्या मनोगतातून या मॉल साठी शुभूच्या दिल्या तर लातूरचे आ. अमित विलासराव देशमुख व आ. अभिमन्खू पवार यांनी शुभेच्छा संदेशा द्वारे किसान फॅशन मॉलच्या शुभारंभास शुुभेच्या दिल्या यावेळी त्यांच्या शुभेच्या संदेशांचे वाचन किसान फॅशन मॉलचे सर्वेसर्वा आ. धनपाल सुर्यनारायण गुप्ता यांनी करून आभार व्यक्त केले.  या कार्यक्रमासाठी लातूरकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR