25.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयकुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात; ६ ठार

कुंभमेळ्याहून परतताना भीषण अपघात; ६ ठार

बेळगाव : वृत्तसंस्था
सध्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाऊन गंगास्रान करण्यासाठी भाविकांची ओढ पाहायला मिळत आहे. या भक्तीमार्गाच्या प्रवासात अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. सोमवारी आज पहाटे आणखी एक अपघाताची घटना घडली असून या अपघातात ६ जण जागेवरच ठार झाले आहेत. तर, दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्य नागरिक प्रयागराजला जाऊन दर्शन घेत आहे. येथील पवित्र कुंडात स्रान करुन आनंद व समाधान घेत आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाऊन परत येत असताना मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे अपघाताची घटना घडली. टेम्पो ट्रॅक्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक तोडून पलीकडच्या रस्त्यावर गेलेल्या टेम्पो ट्रॅक्सला बसची धडक बसली.

या भीषण अपघातात बेळगाव जिल्ह्यातील ६ जण जागीच ठार झाले असून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांमध्ये भालचंद्र नारायण गौडर (वय ५०, रा. गोकाक,) सुनील बाळकृष्ण शेडशाळ (वय ४५, रा. हत्तरकी -आनंदपुर गोकाक), बसवराज निरपादप्पा कुर्ती (वय ६३, रा. गोकाक), बसवराज शिवाप्पा दोडमणी (वय ४९, रा. गोकाक), इराण्णा शंकराप्पा शेबिनकट्टी (वय २७, रा. गुळेदगुड्ड) आणि वीरूपाक्ष चन्नाप्पा गुमती(वय ६१, रा. गोकाक) अशी नावे आहेत. तर, मुस्ताक शिंधिकुरबेट आणि सदाशिव उपदली हे अपघातात गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR