16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeसंपादकीय विशेषकृत्रिम बुद्धिमत्तेचं काय करायचं?

कृत्रिम बुद्धिमत्तेचं काय करायचं?

जागतिक आर्थिक संस्थेच्या एका अहवालात म्हटले, एआय तंत्रज्ञानावर भारताचा खर्च हा २०२५ पर्यंत ११.७८ अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २०३५ पर्यंत एआय तंत्रज्ञान भारतीय अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलर जोडण्याला हातभार लावेल. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात एआय विकासाला चालना देण्यासाठी इच्छुक आहेत. तथापि, एआयमुळे मानवी कौशल्य गमावण्याची शक्यता, जादा खर्च आणि किचकटपणा, विश्वसनीयता आदी मुद्दे आणि तंत्रज्ञानावरचे वाढते अवलंबित्व असे अनेक फटके बसू शकतात, ही जागतिक भीती दुर्लक्षित करता येणार नाही.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यापक प्रमाणात वापर करण्यात आला. या तंत्राची मदत घेत हिंदी, तमिळ आणि तेलुगूसारख्या भाषांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित गाणीही तयार करण्यात आली. ही गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. शिवाय मतदारांना आणि पक्षकार्यकर्त्यांना, समर्थकांना व्यक्तिगत मेसेज देण्यासाठी एआय संचलित व्हॉईस क्लोनिंग टूलचा देखील वापर केला गेला आहे. तेलुगूत मोदी यांचे डिजिटल रूपातून तयार केलेले गाणे सोशल मीडियावर दोन दशलक्षपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले. या तुलनेत त्यांच्याच आवाजातील तमिळ भाषेतील गाणे २.७ दशलक्षपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले. याशिवाय मोदी यांचा आवाज असणा-या एका पंजाबी गीतालाही सोशल मीडियावर १७ दशलक्षपेक्षा अधिक काळ पाहिले गेले.

भारतीय अमेरिकी गायिका फाल यांनी मोदी यांच्यावर साकारलेले ‘एव्हेडन्स इन मिलेट्स’ या त्यांच्या गीताला ग्रामीण नामांकन मिळाले आहे. काँग्रेस आणि भाजपने एआय पुरस्कृत व्हॉईस क्लोनिंग टूलचा विपूल वापर केला आहे. यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. काही दूरचित्रवाहिन्यांनी कार्यक्रम संचलनासाठी ओडिसी, कन्नड आणि हिंदीत एआय अँकरचा आविष्कार केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने भारतात आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. उच्च प्रतीचे तंत्रज्ञान, उपचार, निदान करण्याबरोबरच रुग्णांची काळजी करण्याची जबाबदारी उपकरण पार पाडत आहेत. परिणामी आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. जागतिक आर्थिक संस्थेच्या एका अहवालात म्हटले, एआय तंत्रज्ञानावर भारताचा खर्च हा २०२५ पर्यंत ११.७८ अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २०३५ पर्यंत एआय तंत्रज्ञान भारतीय अर्थव्यवस्थेत एक ट्रिलियन डॉलर जोडण्याला हातभार लावेल. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात एआय विकासाला चालना देण्यासाठी इच्छुक आहेत.

या सर्व गोष्टी एक प्रश्न निर्माण करत आहेत आणि ते म्हणजे एआय हळूहळू जग ताब्यात घेणार काय? १ नोव्हेंबर रोजी ब्रिटनच्या ऐतिहासिक बॅलेचले पार्कमध्ये आयोजित पहिल्या एआय सुरक्षा शिखर परिषदेत राजकीय आणि उद्योग जगातील मान्यवरांनी एआयमुळे निर्माण होणा-या धोक्यावर चर्चा केली. तंत्रज्ञानाला सुरक्षित रूपाने कसे विकसित करता येईल, यावर मंथन करण्यात आले. संयुक्त राष्ट्र आणि युरोपीय संघासह सुमारे २८ देशांनी शिखर संमेलनात सहभाग नोंदविला होता. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. भारताचे प्रतिनिधित्व राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी एआय आणि तंत्रज्ञानाने चांगले, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. एआयमुळे वेगाने होणा-या प्रगतीची धास्ती आहेच त्याबरोबर उत्साह देखील निर्माण होत आहे. या परिषदेत सामील झालेल्या मंडळींनी एआयमुळे होणारे संभाव्य तोटे आणि फायदे यावर चर्चा केली. एआयमुळे मानवता संरक्षित राहील, अशी आशा बाळगून असणा-या लोकांनी देखील आपले मत मांडले. त्यांनी या मुद्याची जागतिक पातळीवर असणारी व्यापकता सांगितली.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी संगणकावर मानवाच्या वाढणा-या अवलंबित्वाबाबत तसेच मानवतेच्या सुटणा-या नियंत्रणाबाबत चिंता व्यक्त केली. सायबर हल्ल्यातील एआय तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरावरही चर्चा करण्यात आली. अशावेळी एआयचा वाढता वेग हा चिंताजनक परिस्थिती निर्माण करणारा असून त्याचा कधी थांगपत्ताही कोणाला लागला नाही, हे विशेष. त्यामुळे भविष्यात जागतिक अर्थव्यवस्था ढासळू शकते आणि लोकशाही संकटात सापडू शकते, असे बोलले गेले. अर्थातच अशा प्रकारची परिषद आयोजित करणे ही चांगली सुरुवात आहे. भारत देखील अशाच परिषदेचे डिसेंबरमध्ये आयोजन करण्याचे नियोजन करत आहे. यजमान देश असल्याने ब्रिटनने अधिकृतरीत्या एआय सुरक्षा संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली. ही संस्था एआयमुळे निर्माण होणा-या स्थितीच्या सुरक्षेचे आकलन करेल. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कुशल कर्मचारी, लेखक, अकाऊंटंट, आर्किटेक्ट आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर क्षेत्रातील मंडळींना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागू शकते, असे भाकित केले. एआयमुळे मानवी कौशल्य गमावण्याची शक्यता, जादा खर्च आणि किचकटपणा, विश्वसनीयता आदी मुद्दे आणि तंत्रज्ञानावरचे वाढते अवलंबित्व असे अनेक फटके बसू शकतात. दुसरीकडे एआयच्या समर्थकांनी केलेल्या दाव्यानुसार एआय तंत्रज्ञान सक्रिय केल्याने डाटा विश्लेषण करण्यात, निर्णय घेण्यात, चोवीस तास सक्रिय राहणे, त्रुटी कमी करणे आणि सुरक्षेचे निकष निश्चित करण्यात सुधारणा करता येऊ शकते. मतदाराची नोंदणी आणि पडताळणी यासाठी एआयचा वापर करता येऊ शकतो.

मतदारांची संभाव्य भूमिका आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी एआयचा वापर केल्याने राजकीय पक्षाला, नेत्यांना फायदा मिळेल. एआय हा मानवी भावना ओळखण्यासाठी आणि राजकीय प्रचार मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या मुद्यांची निवड करण्यासाठी सोशल मीडियावरील मतमतांतरांचे विश्लेषण करू शकतो. या आधारावर राजकीय पक्षांना, नेत्यांना कृति आराखडा तयार करता येऊ शकेल. याशिवाय एआयमुळे फसवणूक, हॅकिंगचे प्रयत्न आणि अन्य गैरप्रकाराचा शोध लावण्यात हातभार लावता येईल तसेच त्याला रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेचे नियोजन करता येणे शक्य आहे. एआयमुळे निवडणुकीचा संभाव्य निकाल सांगण्यासाठी ऐतिहासिक डेटा विश्लेषण आणि सध्याच्या घटनांचा विचार करता येऊ शकतो. एआय संचित चॅटबॉट हे मतदारांना मतदान केंद्र, उमेदवारांचे प्रोफाईल आणि अतिरिक्त निवडणुकीसंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करू शकते. एकंदरीत सर्व नोकरीच्या ठिकाणी एआयचा वापर करू द्यावा का? या प्रश्नाचे उत्तर शोधावेच लागेल. यात समाधान देणा-या रोजगारांचा देखील समावेश आहे. असे असताना आपण कशासाठी बिगर मानव विभाग विकसित करत आहोत? हा विभाग अतिशय हुशारीने मानवाला मागे टाकू शकतो आणि मानवाचे स्थान घेऊ शकतो. अद्याप संपूर्णपणे एआयकडे वळण्यासाठी वेळ लागेल. हा सुरुवातीचा टप्पा आहे. पण याच टप्प्यावर एआय तंत्रज्ञान हे हानीकारक आहे की स्वागतार्ह आहे, याचा विचार करायला हवा.

– कल्याणी शंकर,
ज्येष्ठ पत्रकार, नवी दिल्ली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR