कृषी कर्जाची मर्यादा वाढवली

आरबीआयचा निर्णय, आता शेतक-यांना हमीशिवाय मिळणार कर्ज

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय रिझर्व्ह बँकेने आज शेतक-यांना देण्यात येणा-या कृषी कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी घेतला. त्यामुळे आता कृषी कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजार रुपयांवरून आता ती २ लाख रुपये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज विनातारण अर्थात हमीशिवाय मिळणार आहे. त्यामुळे शेतक-यांना २ लाखांपर्यंतचे कर्ज सहजगत्या मिळण्याची सोय होणार आहे.

महागाई आणि शेतीसाठी वापरल्या जाणा-या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजारांवरुन २ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या शेवटच्या पतधोरणात शेतक-यांना मोठा दिलासा दिला. वाढत्या महागाईपासून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता हमीशिवाय २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली.

या निर्णयामुळे अल्प व अल्पभूधारक शेतक-यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल, असे शक्तीकांत दास म्हणाले. २०१० मध्ये आरबीआयने कृषी क्षेत्राला कोणतीही हमी न देता १ लाख रुपये कर्ज देण्याची मर्यादा निश्चित केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये ते १.६ लाख रुपये करण्यात आले होते. आता ही मर्यादा २ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून, याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

रेपो रेट जैसे थे
याआधी सलग ११ व्यांदा आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच रेपो दर ६.५ टक्के राहील. दुसरीकडे सरकारने रोख राखीव प्रमाण ४ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे देशातील बँकांना १.१५ लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news