26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रकृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक!

कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक!

पाच वर्षांचे नियोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

पंढरीत ‘कृषी पंढरी’ प्रदर्शनाचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पंढरपूर /प्रतिनिधी
शेती फायद्याची व्हावी, कमी उत्पादन खर्चात उत्पादन वाढ यावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी येत्या ५ वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित ‘कृषी पंढरी’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते.

आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलनियोजनपासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजारसाखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन अशा सर्व बाबी गावात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा गावपातळीवरील सर्व घटकांना लाभ होईल. नुकतेच पिक विमा योजना सुधारित केली आहे. आगामी काळात ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, पंप आदींमध्ये गुंतवणूक करणार आहे. साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषिपंपांचे वीजबिल आकारले जात नाही.

शेतक-यांना मोठ्या प्रमाणात पणनच्या योजनांचा लाभ बाजार समित्यांच्या माध्यमातून मिळत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय संस्थात रूपांतरण करण्याचा केंद्र शासनाच्या प्रयत्न असून १८ प्रकारचे व्यवसाय या संस्थाना करता येणार आहेत. बाजार आणि शेतक-यांमध्ये दुवा ठरण्याचे काम या संस्था करतील. स्टोरेज, कोल्ड स्टोरेज आदी व्यवस्था करून शेतक-यांच्या माल योग्य भावात मोठ्या प्रमाणात माल विकला जाईल, असा प्रयत्न असल्याचेही फडणवीस म्हणाले. यावेळी पणनमंत्री जयकुमार रावल, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक प्रशांत परिचारक यांनी केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR