बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही हा मला डाऊट आहे. पोलिस त्याचा तपास करत आहेत. पण तो सापडत नाही, त्यामुळे त्याचा खून झाला असावा अशी शंका असल्याचे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव नाही, त्यामुळे कारवाई करणे योग्य नाही असे शिरसाट म्हणाले. तपासात थोडे जरी आढळून आले तर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.
आम्ही ‘छावा’सारखे लढलो
उद्धव ठाकरेंनी स्वत: ‘छावा’ बघायला पाहिजे असे संजय शिरसाट म्हणाले. शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यांना आता माघार घेता येत नाही, आम्ही ‘छावा’सारखे लढल्याचे शिरसाट म्हणाले. आदिती तटकरे यांनी बोलावले म्हणून आम्ही गेलो असे नाही, अनेकांनी ‘छावा’ चित्रपट बघितला आहे त्यामुळे कोणी चित्रपट बघण्यासाठी गेले नाही
अबू आझमीला झंडू बामचा तडका देणार
दरम्यान, यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर देखील जोरदार टीका केली. अबू आझमीला झंडू बामचा तडका देणार असल्याचे शिरसाट म्हणाले. ओवेसी असेल किंवा अबू आझमी हे विष कालवण्याचे काम करत असल्याचा हल्लाबोल संजय शिरसाटांनी केला.