31.7 C
Latur
Friday, April 25, 2025
Homeक्रीडाकेकेआरविरुद्ध गुजरातचा सहज विजय

केकेआरविरुद्ध गुजरातचा सहज विजय

कोलकाता : वृत्तसंस्था
अजिंक्य रहाणे गुजरातच्या संघासमोर एकटाच लढला आणि त्यामुळे गुजरातला केकेआरवर मोठा विजय साकारता आला. केकेआरवर यावेळी घरच्याच मैदानात लाजीरवाणा पराभव पत्करण्याची वेळ आली.

शुभमन गिलच्या धडाकेबाज ९० धावांच्या जोरावर गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १९८ धावा केल्या होत्या. केकेआरचा संघ विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरला खरा, पण केकेआरच्या फलंदाजांनी अजिंक्य रहाणेला एकटे पाडले. अजिंक्यने अर्धशतक झळकावले, पण त्यानंतर तो एकही धाव करू शकला नाही. अजिंक्य बाद झाला आणि त्यानंतर केकेआरने हराकिरी पत्करली. त्यामुळेच गुजरातने ३९ धावांनी दमदार विजय साकारला.

केकेआरविजयासाठी १९९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. पण अजिंक्य रहाणे यावेळी एकटाच पडल्याचे पाहायला मिळाले. कारण सलामीवीर गुरबाझ, सुनील नरिन आणि वेंकटेश अय्यर हे स्वस्तात बाद झाले. पण अजिंक्य चांगली लढत देत होता. अजिंक्यने अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर तो लगेच बाद झाला. अजिंक्यने पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. त्यानंतर केकेआरच्या विजयाची आशा रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांच्यावर होती. पण हे दोघेही अपयशी ठरले आणि गुजरातने सामना जिंकला.

तत्पूर्वी, गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांनी केकेआरच्या गोलंदाजीचा पालापाचोळाच करून टाकला. साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांनी गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून १३ व्या षटकात ११४ धावांची दणकेबाज सलामी दिली. साई सुदर्शनने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली. साई बाद झाला असला तरी शुभमन गिल मात्र खेळपट्टीवर दमदार फलंदाजी करत होता. गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि शतकाच्या दिशेने वाटचाल केली होती. परंतु तो बाद झाला. पायाभरणी चांगली झाल्याने केकेआरसमोर १९९ धावांचे आव्हान उभे केले होते. परंतु त्यांना हे आव्हान पेलता आले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR