बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव अशा अनेक गावांत अचानक केस गळती सुरू झाली. यामुळे नागरिक हैराण झाले होते. नागरिकांमध्ये या भीतीचे वातावरण कायम आहे. या टक्कल व्हायरसने चिंता वाढवली असतानाच आता पुन्हा एकदा बुलडाण्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकरणाला गंभीर वळण लागले असतानाच आता नखं गळती सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
रुग्णांची नखे अचानक विद्रुप होऊन कमजोर होऊ लागली असून अनेकांची नखे गळून पडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या परिसरात आता भीतीचे वातावरण पसरले आहे. नक्की हा कुठला आजार आहे? याची अजून माहिती मिळाली नाही.