37.7 C
Latur
Friday, April 25, 2025
Homeसोलापूरखरा सूत्रधार कोण?

खरा सूत्रधार कोण?

डॉ. शिरीष वळसंगकरांच्या शेवटच्या कॉल्समधून सर्व उघड?

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आत्महत्या प्रकरणी अनेक धागेदोरे सापडत आहेत. मनीषा मुसळे-माने या महिला आरोपीला वळसंगकर हत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महिलेकडून झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून वळसंगकरांनी स्वत:चा शेवट केल्याचा दावा आता एका निकटवर्तीयाने खोडून काढला आहे. एका जवळच्या नातेवाईकाकडून त्यांचे वारंवार खच्चीकरण सुरू असल्याची माहिती जवळच्या निकटवर्तीयाने दिली आहे.

दरम्यान, वळसंगकरांच्या जवळच्या निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर हे कणखर आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्तिमत्त्व होते. गेल्या वर्षभरापासून त्यांना जवळच्या नातेवाईकाकडून सतत त्रास सहन करावा लागला होता. अपमानास्पद वागणूक, तिरस्कार, या कारणामुळे त्यांचे सातत्याने खच्चीकरण सुरू होते, अशी माहिती निकटवर्तीयाने दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर यांना वारंवार मानसिक त्रास दिला जात होता.

त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या नातेवाईकाने वळसंगकरांवर तीन वेळा हात उचलला होता. या गोष्टी त्यांनी शांतपणे सहन केल्या आहेत. ज्या मनीषा मानेला त्यांनी मोठ्या पदापर्यंत पोहोचवले, ती महिला देखील नातेवाईकाच्या हातातील बाहुली बनली आहे, अशी माहिती निकटवर्तीयाने दिली आहे.

शेवटच्या कॉल्समध्ये दडलंय सत्य
आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वी वळसंगकरांनी विश्वासू उद्योजक मित्रासमोर फोनवर मन मोकळे केले. त्यांच्यातील संवादातून वळसंगकरांना होणारा त्रास, मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक याची माहिती मिळाली असल्याचे समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR