16.8 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeलातूरखाद्यतेल दरवाढीने गृहिणींचे बजेट बिघडले

खाद्यतेल दरवाढीने गृहिणींचे बजेट बिघडले

चाकूर : प्रतिनिधी
खाद्यतेलाच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. महागाईच्या झळा तीव्र झाल्याचा याचा फटका सामान्य नागरिकांना बसू लागाल आहे.  राज्यातील लाखो महिलांना ग्रामीण तथा शहरी भागात रोजगाराची वानवा आहे. त्यात महागाईच्या झळा तीव्र झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
या महागाईमुळे ऐन दिवाळीच्या सणात हात आखडता घ्यावा लागाला आहे. सणाच्या कालावधीत दरवाढीने सर्वसामान्य गृहिणीचे बजेट पुरते कोलमडले होते. परिणामी, सण साजरा करताना हात आखडता घ्यावा लागणार आहे. सणांच्या तोंडावर खाद्यतेलाच्या बाजारात तेजी निर्माण झाली होतीे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढविल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. सर्वाधिक वापरले जाणारे सोयाबीन तेल तथा इतरही खाद्यतेलाचे भाव लिटरमागे ३५ रुपयांनी वधारल्याचे पाहायला मिळत आहे. या महागाईत होरपळणा-या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गतवर्षी कच्च्या तेलावरील आयात शुल्क रद्द केले होते. त्यामुळे गगनाला भिडणा-याा खाद्यतेलाच्या किमती काही अंशी घसरल्याने गृहिणींसह हॉटेलचालकांना दिलासा मिळाला होता. जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमती स्थिर होत्याही मात्र, दरवर्षी सणांच्या कालावधीत तेलाची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे तेल बाजारात तेजी येते.
यावर्षी दिवाळी सणाच्या तोंडावर केंद्राने कच्च्या सोयाबीनवरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढविल्याने त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी, महिला, हॉटेलचालक यांच्यासह सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सरकारने एका हाताने दिले आणि दुस-या हाताने परत घेतल्याची चर्चा जनतेच्या तोंडी रंगू लागली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR