34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरखुनाच्या गुन्ह्यातील संशियत डॉ. घुगे व सहकारी अद्याप फरारच

खुनाच्या गुन्ह्यातील संशियत डॉ. घुगे व सहकारी अद्याप फरारच

लातूर : प्रतिनिधी
आपल्याच रुग्णालयातील कर्मचा-याला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याप्रकरणी येथील आयकॉन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रमोद प्रभू घुगे याच्यासह दोघांवर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना घडल्यापासून डॉ. घुगे व त्याचा एक सहकारी फरार आहे. त्यांचा शोध पोलिसांची पथके ठिकठिकाणी घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी संबंधित हॉस्पिटलमधील कर्मचा-यांची चौकशी सुरु केली आहे; तसेच सीसीटीव्ही कॅमे-यांचीही तपासणी केली जात आहे.
लातूरातील बसस्थानक क्रमांक दोनच्या परिसरात असलेल्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये सेक्युरिटी सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेल्या बाळू डोंगरे यांचा खून झाल. याप्रकरणी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रमोद घुगे व अनिकेत मुंडे यांच्यावर बेदम मारहाण करून खून केल्याच्या संशयावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना घडल्यापासून डॉ. घुगे व मुंडे हे दोघेही फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथके तैनात करण्यात आली आहेत. पण, डॉक्टरचा शोध लागलेला नाही. दरम्यान, पोलिसांनी आयकॉन हॉस्पिटलमधील कर्मचा-यांची चौकशी सुरू केली आहे. यातून काही माहिती हाती येते का, याचा प्रयत्न पोलिसांचा आहे; तसेच सीसीटीव्ही कॅमे-यांचीदेखील तपासणी केली जात आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीसांकडून सांगितली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR