27.3 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeलातूरगंगाधर व संजय जाधवची कसून चौकशी

गंगाधर व संजय जाधवची कसून चौकशी

नीट पेपरफुटी प्रकरण सीबीआय पथक ठाण मांडून

लातूर : नीट गुणवाढीसंदर्भात विद्यार्थी-पालकांना आमिष दाखवून फसवणूक करणा-या गुन्ह्याची व्याप्ती देशभर असल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यानुसार देशभरात ही यंत्रणा विविध राज्यात सक्रीय झाली आहे. गंगाधरला आंध्र प्रदेशातून अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या कारनामे समोर आले. लातुरातील गुन्ह्यात गंगाधर आणि संजय जाधव याची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. यासाठी सीबीआय गंगाधरला लातुरात आणणार असल्याचे समोर आले आहे.

सीबीआय कोठडीत असलेल्या गंगाधरने विविध राज्यात एजंट नेमल्याची माहिती उघड झाली असून यातून कोट्यवधींची माया जमा करण्याचे त्याचे नियोजन असल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या सीबीआयने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या चौकशीतून विविध राज्यातील गुन्ह्यांची उकल होणार आहे. त्याने एजंटाच्या माध्यमातून किती पालक-विद्यार्थ्यांना आमिष दाखवत गंडविले, याचाही तपास सीबीआयच्या विविध पथकाकडून केला जात आहे. गुणवाढीचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या प्रकरणातील गंगाधर हा म्होरक्या असल्याचे आता समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तपास यंत्रणांना गुंगारा देत पसार झालेला इरण्णा कोनगलवार याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी लातूर येथील विशेष न्यायालयात अर्ज केल्याची माहिती शनिवारी समोर आली होती. त्याच्याही अटकेसाठी सीबीआयचे पथक मागवार आहे.

महाराष्ट्र-बिहार कनेक्शनचा शोध सुरू
लातुरात आठ दिवसांपासून ठाण मांडून असलेल्या सीबीआयकडून नीट प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहार कनेक्शनचा शोध घेतला जात आहे. तपास यंत्रणाच्या हाती लागलेल्या दहापैकी सात ते आठ प्रवेशपत्रे बिहार राज्यातील असल्याचे समोर आले आहे.

सीबीआयकडील पुरावे
संशयीत आरोपींच्या घराची सीबीआयने झडती घेतली असून, गत आठ दिवसांपासून कसून चौकशी केली जात आहे. आठवडाभरातील तपासात अनेक धागेदोरे, पुरावे हाती लागल्याचे लातूर न्यायालयात सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले. नीट प्रकरण देशपातळीवर असून इतर आरोपींनाही अटक करायची आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR