30.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeलातूरगंजगोलाईतील अतिक्रमण हटवले; पुनर्वसनही केले

गंजगोलाईतील अतिक्रमण हटवले; पुनर्वसनही केले

लातूर : प्रतिनिधी
शहरातील गंजगोलाईतील अतिक्रमण हा नेहमीचा कळीचा मुद्दा राहिला आहे. लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने दि. २३ डिसेंबर रोजी गंजगोलाईतील अतिक्रमण काढून जवळपास २०० ते २५० भाजीपाला, फळे विक्रेत्यांचे पुनर्वसन नवयुग थिएटरच्या परिसरातील मनपाच्या दोन प्लॉटवर केले. त्यामुळे गंजगोलाई अतिक्रमणमुक्त झाली.  गंजगोलाईत सर्वाम मोठा ७० फुटांचा रस्ता आहे. परंतु, भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांचे अतिक्रमण, हातगाडीवाले, झाडू, फळे विक्रेते, बांगड्यावाले, क्रॉकरीवाले, अशा छोट्या, छोट्या व्यवसायिकांनी व्यापलेली जागा, त्याच ऑटोरिक्षांची रांग, इतर वाहनांची वर्दळ यामुळे गंजगोलाईतील ७० फुटाचा रस्ता केवळ १५ फुटाचा झाला होता. त्यामुळे वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती.
यातुन मार्ग काढण्यासाठी मनपा प्रशासनाने सोमवारी सकाळी गंजगोलाईतील अतिक्रमण काढले. जवळपास २०० ते २५० भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांचे नवयुग थिएटरच्या परिसरातील मनपाच्या दोन प्लॉटवर पूनर्वसन करण्यात आले.  लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त खानसोळे व त्यांच्या टिमने गंजगोलाईतील अतिक्रम काढले.   नवयुग थिएटरच्या परिसरात या भाजी व फळ विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात आले. अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करताना पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR