28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeलातूरगटविकास अधिका-याच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न 

गटविकास अधिका-याच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न 

चाकूर : प्रतिनिधी
तालूक्यातील हाणंमतजवळगा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पाणी द्या या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी ंिद २४ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समितीमध्ये गटविकास अधिका-यांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पाचशे महिला व पुरूषांचा जमाव कार्यालयाबाहेर पाणी द्या या मागणीच्या घोषणा देत होते. हाणंमतजवळगा गावाला ंिहपळनेर येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. ंिहपळनेर येथील काही व्यक्तींनी या पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीवरील  मोटारी व पाईपलाईची नासधूस केली आहे.
यामुळे पंधरा दिवसांपासून गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे निवेदन देऊन सदरील व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली परंतु प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही तसेच पाणीपुरवठाही सुरळीत केला जात नाही.  पाण्याअभावी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या तातडीने सोडवावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिल्या होता.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी गटविकास अधिका-यांंच्या दालनात ५ ते ६ व्यक्तींनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस व कर्मचा-यांंनी ग्रामस्थांच्या हातातील डिझेलच्या बाटली काढून घेतल्या. गावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा, पाणीपुरवठा योजनेवरील मोटारी व पॅनल बोर्डची, पाईपलाईनची नासधुस केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR