31.7 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeअंतरराष्ट्रीयगाझामध्ये भीषण अन्नटंचाई; कासवाचे मांस खाण्याची वेळ

गाझामध्ये भीषण अन्नटंचाई; कासवाचे मांस खाण्याची वेळ

 

दमास्कस : वृत्तसंस्था
इस्रायलने गाझामध्ये येणारी मानवतावादी मदत गेल्या काही दिवसांपासून थांबवली आहे. त्यामुळे गाझामधील नागरिकांना भीषण अन्न टंचाईचा सामना करावा लागत आहे. गाझामधील लोकांवर समुद्रातील कासवांचे मांस खाण्याची वेळ आली आहे. याठिकाणी एवढी अन्नटंचाई आहे की, लोकांना कासवाचे मांस खाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यापूर्वी काही संस्था या लोकांना मदत करत होत्या. मात्र, त्यांच्याकडील अन्नसाठाही आता संपला आहे. गाझामधील मच्छीमारांनी सध्या समुद्रातील कासव पकडण्यास सुरुवात केली आहे.

गाझामधील मच्छीमार असलेला नागरिक अब्देल कनन म्हणाला, आमच्याकडे कासवाचं मांस खाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. आम्ही यापूर्वी कधीही कासवाचं मांस खाल्लेलं नाही आणि आम्ही तसा विचारही केलेला नव्हता. आम्ही मच्छीमार आहोत, आम्ही केवळ मासेच खायचो. आम्ही आत्तापर्यंत तिस-या वेळेस आम्ही कासवाचं मांस खाल्लेलं आहे. सैन्याने आम्हाला समुद्रात प्रवेश करण्यास बंदी घातली. मच्छीमार मृत्यूला तोंड देत बाहेर पडत आहे.

गाझा पट्टीकडे जाणा-या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. इथल्या मार्केटमध्ये फार काही सामान उरलेलं नाही. काकडी, टोमॅटो आणि मिरची याशिवाय इथे दुसरं काहीही नाही. सध्या गाझामधील लोक जगण्यासाठी अन्नाच्या शोधात आहेत. अन्न मिळवण्यासाठी धडपड करत असताना अनेक मच्छीमार आत्तापर्यंत शहीद झाले आहेत. शिवाय अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. इस्रायलने गेल्या आठ आठवड्यांपासून इथे येणारी मानवी मदत थांबवली आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR