29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeसोलापूरगुडफ्रायडेनिमित्त चर्चमध्ये प्रार्थना

गुडफ्रायडेनिमित्त चर्चमध्ये प्रार्थना

सोलापूर : गुड फ्रायडेनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. प्रभू येशू यांना वधस्तंभावर चढविताना त्यांनी उद्‌गारलेल्या शेवटच्या सात वाक्यांवर रे. दिलीप व्होरा यांनी प्रवचन दिले. पहिली ख्रिस्ती मंडळी, रंगभवन येथे रेव्ह. विकास रणशिंगे, न्यू लाइफ फेलोशिप चर्च सोलापूर येथे झालेल्या भक्तीसभेत रेव्ह. सुभाष माने, एपीफणी चर्चमध्ये रेव्ह. सचिन पारवे, गांधीनगर येथील हिंदुस्थानी कॉन्व्हेन्ट चर्चमध्ये इम्मानुएल म्हेत्रे यांनी भक्ती संदेश दिले.

प्रभू येशू ख्रिस्तांचे मनुष्य रूपात या भूतलावर त्यांचे आयुष्यमान साडेतेहतीस वर्षे इतके होते. शेवटच्या काळात त्यांनी जो उद्देश ते घेऊन आले होते ते पूर्ण करत असताना वधस्तंभावर सर्वांसाठी आपले प्राण दिले. याचे स्मरण म्हणून संपूर्ण जगात सर्वपंथीय चर्चमध्ये गुड फ्रायडे साजरा केला जातो. जगाच्या शांतीसाठी व कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना केली जाते. न्यू लाइफ फेलोशिप चर्च येथे झालेल्या भक्तीसभेला सुभाष माने, डॉ. अनिल कट्टी, मोजेस गवळी, संजय गायकवाड, अमृता माने व शिबा लाजरस यांनी संदेश दिले बहुसंख्य ख्रिस्ती बांधवांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR