18.3 C
Latur
Sunday, November 17, 2024
Homeमहाराष्ट्रगुलाबी जॅकेट घातल्याने गद्दारीचा रंग बदलत नाही

गुलाबी जॅकेट घातल्याने गद्दारीचा रंग बदलत नाही

शिरूर : प्रतिनिधी
शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अंगावर गुलाबी जॅकेट चढवले तरी तुम्ही गद्दारीचा रंग कसा लपवणार, असा निशाणा अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर साधला आहे.

महाराष्ट्रात चुकीला माफी आहे, गद्दारीला थारा नाही हे महाराष्ट्र दाखवून देईल. घड्याळ जरी चोरलं असलं तरी वेळ आता तुतारीची आहे. पराभव समोर दिसत असल्याने अजित पवार भावनिक आवाहन करत आहेत. ३५ वर्षे समाजकारण करत असताना अजित पवारांना वस्तुस्थितीची जाणीव झाली असावी. त्यामुळे त्यांना भावनिकतेचा आधार घ्यावा लागत असेल. मात्र शरद पवार सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण ही भूमिका बारामतीकर पार पाडणार आहेत, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला.

राज्यात महाविकास आघाडीला १६५ पेक्षा अधिक जागा मिळतील. मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल. ट्रंम्पेटचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला तरीही आमचे ३१ खासदार निवडून आले. जनता सुज्ञ आहे यंदा असे होणार नाही. महाविकास आघाडीला राज्यभर पोषक वातावरण आहे, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले

महायुती सरकार येणार नाही
देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी स्वत: कबुली दिली मी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये नाही. कारण तुमचे सरकारच येणार नाही, तर तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये कसे असणार, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR