25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रगृहमंत्री अमित शाह लालबाग राजाच्या चरणी लीन

गृहमंत्री अमित शाह लालबाग राजाच्या चरणी लीन

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील लालबाग परिसरात असलेला लालबागचा राजा हा जगभरात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा राजा अशी लालबागचा राजाची ख्याती आहे. लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी येत असतात. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही उपस्थित होते.

अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौ-यावर आले आहेत. यावेळी मुंबई दौ-यानिमित्त आलेल्या अमित शाह यांनी आज सोमवारी ९ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची पत्नीही उपस्थित होत्या.

अमित शाह साधारण सकाळी ११.५५ च्या दरम्यान लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आले. यावेळी त्यांनी गणरायांच्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी बाप्पााला नारळाचे तोरण अर्पण केले. तसेच त्याच्या चरणावर हळद, कुंकू आणि फुलेही वाहिली. यानंतर अमित शाह यांनी बाप्पााच्या चरणावर डोके ठेवत आशीर्वाद मागितला.

गेल्यावर्षीही अमित शाह यांनी सहकुटुंब लालबाग राजाचे दर्शन घेतले होते. लालबागचा राजाला दाखल होण्यापूर्वी अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी त्यांनी लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले. त्यासोबत अमित शाहांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील निवासस्थानी असलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. याआधी शरद पवारांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR