22.5 C
Latur
Wednesday, August 27, 2025
Homeलातूरगोसावी समाज प्रतिष्ठानचा मेळावा उत्साहात

गोसावी समाज प्रतिष्ठानचा मेळावा उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
गोसावी समाज प्रतिष्ठान लातूर ही सामाजिक संस्था गेली २८ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम राबवते. याचाच एक भाग म्हणून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गोसावी समाज प्रतिष्ठान लातूर आयोजित त्रिसूत्री कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला समाज बांधवाचा मोठा प्रतिसाद होता.
कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने व ह.भ.प. गुरुवर्य माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पत्रकार सुखदेव गिरी, युवा वक्ते अविनाश भारती, प्रमुख पाहुणे स्वप्नील भारती, योगेश बन, ओमप्रकाश गिरी आदि मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी समाजाला संबोधित केले.
यावेळी राज्यसमाज भूषण या पुरस्काराने प्राचार्या डॉ. भागीरथी गिरी, डॉ. विवेकानंद गिरी, युवा उद्योजक गणेश गोसावी, प्रा. ज्योती हनुमंत भारती, आदर्श शिक्षक राहूल बावा, युवा वक्ते राहूल गिरी आदि मान्यवरांना राज्यसमाज पूरस्कार तर सुरेश पुरी, दीपाली गिरी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंताचा गुणगौरवही या प्रसंगी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पुरी यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. जयमाला पुरी, पूजा पुरी यांनी केले. तर आभार पूजा गिरी यांनी मानले. या त्रिसूत्री कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अरुण गिरी, गणेश पुरी, सतिश गिरी, प्रा. सुभाष गिरी, शिवकुमार गिरी, प्रा.डॉ. वशिष्ठ बन, डॉ. विश्रांत भारती, शिवशंकर गिरी, सुरेश भारती, बाळासाहेब भारती, विनायक गिरी, अशोक गिरी, धनराज गिरी, डॉ. निलेश पुरी, दत्ता पुरी, संजय गिरी, पद्माकर गिरी, महेश भारती, शुभम गिरी, सचिन गिरी, आदिनी परिश्रम घेतले.
……………………….११………………………….

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR