24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरग्लोबल नॉलेज स्कुलमध्ये पौराणिक वस्तू प्रदर्शन

ग्लोबल नॉलेज स्कुलमध्ये पौराणिक वस्तू प्रदर्शन

लातूर : प्रतिनिधी
येथील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान दिवस तसेच चिमुकल्यांचा आनंदनगरी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यात पौराणिक वस्तुंच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व इतिहासाला विज्ञान जोडण्यासाठी पौराणिक वस्तूंचे प्रदर्शन तसेच मुलांच्या व्यवहारी ज्ञानाला चालना देण्यासाठी मार्केटींग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक आनंद पाटील, दामिनी पथकाच्या कांबळे, जंगाले व जगदाळे उपस्थित होते. अ‍ॅन्टी एक्सिडेंट गॅजेट हायड्रोलीक ब्रिज या प्रयोगाने सर्वाचे लक्ष वेधले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलचे संस्थापक रमेश बिरादार होते. प्रमुख पाहूणे म्हणुन द्वाराकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील, तालमणी डॉ. राम बोरगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी सूयश बिरादार, सुजित बिरादार, प्राचार्या आम्रपाली सरवदे, प्रशासकीय अधिकारी रामेश्वर सगरे यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR