मुंबई : वृत्तसंस्था
समांथा रूथ प्रभू तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आली आहे. दिग्दर्शक राज निदिमोरूसोबतच्या तिच्या फोटोंमुळे त्यांच्यातील प्रेमसंबंधाच्या चर्चा आता होऊ लागल्या आहेत. तसेच राज निदिमोरू हा विवाहित आहे. त्यामुळे समांथा विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली आहे का असे अनेक प्रश्न आता नेटकरी विचारू लागले आहेत.
दरम्यान, बॉलिवूड आणि साऊथमधील अशी एक अभिनेत्री जी तिच्या चित्रपटांच्या आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे समांथा रूथ प्रभू. समांथा तिच्या घटस्फोटानंतर स्वत:त केलेल्या बदलामुळे आणि ज्यापद्धतीने तिने करिअरमध्ये मिळवलेलं यश आहे त्यामुळे कायम चर्चेत असते.
समांथा आता पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ब-याच काळापासून मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की समांथा रूथ प्रभू दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या सर्व चर्चांमध्ये समांथाने बुधवारी तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर करत एक पोस्टही केली ज्यामुळे ती खरंच प्रेमात आहे, अशा चर्चांना उधाण आले. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये समांथाने ‘नवीन सुरुवाती’चा इशाराही दिला आहे.
तर खरंच असं आहे का? तर समांथाचा नवीन प्रवास हा राज निदिमोरूसोबत नक्कीच सुरू होणार आहे पण तो प्रेमाचा नाही तर व्यावसायिक. म्हणजे समांथा निर्माती म्हणून आता पुढे आली आहे. निर्माती म्हणून ती तिच्या पहिल्या चित्रपट ‘शुभम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चाहत्यांचा उत्साह सतत वाढवत आहे. समांथा रुथच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत बनलेला हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तिने याचसंदर्भातील नुकतेच दिग्दर्शक राज निदिमोरूसोबतचे याच संदर्भातील काही फोटो शेअर केले. ज्यामुळे नेटिझन्स ते डेट करत असल्याचा संशय घेत आहेत.