24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रघरात सर्वांना जागा...

घरात सर्वांना जागा…

पुणे : प्रतिनिधी
घरात सर्वांना जागा आहे. पण पक्षात जागा आहे की नाही? याबाबत व्यक्तिगत मी निर्णय घेणार नाही. माझे सर्व सहकारी संघर्षाच्या काळामध्ये माझ्याबरोबर मजबुतीने उभे राहिले. त्यांना पहिल्यांदा विचारेल, असे सूचक विधान अजित पवार यांच्याविषयी बोलताना शरद पवार यांनी केले असून ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार पुन्हा आले तर त्यांना घरात घेणार का? पक्षात जागा आहे का? असा प्रश्न पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारण्यात आला असता शरद पवारांनी यावर सूचक उत्तर दिले.

दरम्यान, विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय नेते सध्या विविध मतदारसंघांचा दौरा करत आढावा घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांच्या जागावाटपाबाबतही सध्या खलबते सुरू आहेत.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काहीजण शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच अजित पवारांमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थता असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींवर आज (दि. १७ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केले. यावेळी अजित पवार पुन्हा आले तर त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवारांनी सूचक विधान केले.

अजित पवार पुन्हा आले तर त्यांना घरात घेणार का? पक्षात जागा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवारांनी यावर सूचक उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, घरात सर्वांना जागा आहे. पण पक्षात जागा आहे की नाही? याबाबत व्यक्तिगत मी निर्णय घेणार नाही. माझे सर्व सहकारी संघर्षाच्या काळामध्ये माझ्याबरोबर मजबुतीने उभे राहिले. त्यांना पहिल्यांदा विचारेल.

सुप्रिया सुळेंना म्हणून ४० हजारांची लीड
खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतील विजयाबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, मतदारसंघातील लोकांशी तुमचा संवाद कसा आहे? त्यावर ब-याच गोष्टी ठरतात. मात्र आता तसा संवाद होत नाही. बारामतीत जर मला कुणी भेटायला आले तर मला त्यांच्या वडिलांचे नाव विचारावे लागते. तेव्हा कळते हा कुणाच्या घरातला आहे. दोन पिढीतील हा संवाद कायम ठेवला तर लोक कधीही नेत्याला विसरत नाहीत. त्यामुळे घरातलाच विरोधी उमेदवार असतानाही सुप्रिया सुळे यांना ४० हजारांची लीड दिली. त्याचे कारण माझा दोन पिढ्यांतील संवाद कारणीभूत आहे असे शरद पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR