औसा : प्रतिनिधी
शेतकरी हितासाठी वेळोवेळी काँग्रेसने सरकारला जाब विचारला आहे, मात्र सरकार याची गांभीर्याने दखल घेत नाही. दहा वर्षांपूर्वी सहा हजार रुपये सोयाबीनला दर द्यावा म्हणून उपमुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांनी पायी ंिदडी काढली होती मात्र स्वत: ते मुख्यमंत्री राहिले व आज उपमुख्यमंत्री आहेत सोयाबीनचा दर त्यांनी कुठे नेवून ठेवला हे तपासावे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी सोयाबीन करीता थेट ९० दिवसात भावांतर कायदा आणून अधिकचा दर दिला आता मात्र सोयाबीन बाबत देशाचे व राज्याचे कृषी मंत्री कुठलीच ठोस भूमिका घेत नाहीत ते कुठे आहेत? असा सवाल उपस्थिती करीत आगामी काळात सोयाबीन व अन्य शेतमाल दरा बाबत ठोस निर्णय घेतला नाही तर कांग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा औसा येथे छावाचे नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणास भेट देऊन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी पाठींबा देत याप्रसंगी बोलताना दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कीं केंद्र सरकारने सोयाबीन व कच्चे तेल आयात व निर्यात धोरण हे शेतकरी विरोधी आहे. मुळात राज्य सरकारने केंद्राकडे विचारणा करणे महत्वाचे असते मात्र जर तुम्हाला या वादात पडायचे नसेल तर त्यावेळी विलासराव देशमुख साहेबांनी जी भूमिका ठेवली व शेतकरी हित जपले त्याच प्रमाणे हमीभावच्या पुढे मिळणारी तफावत रक्कम भावांतर कायदा लागू करून शेतक-यांना देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
मात्र सरकारची भूमिका शेतकरी विरोधी आहे एकीकडे पीक हातात पडेल कीं नाही ही चिंता व त्या नंतर झालेला खर्च व उत्पादन झालेला शेतमाल याचा खर्चाची कुठलीच बेरीज बाजारात असलेल्या शेतक-यांचा पदरात पडणारी नाही. शेतकरी हितासाठी व प्रश्नासाठी आम्ही वेळोवेळी आवाज उठवला आहे उपोषण कर्ते विजयकुमार घाडगे यांच्या उपोषणास आमचा पाठींबा असून सरकारने याकडे तातडीने लक्ष नाही दिले तर आमचे कांग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार धीरज देशमुख यांनी याप्रसंगी दिला. यावेळी उपोषणस्थळी मारुती महाराज साखर कारखाना चेअरमन शाम भोसले, ट्वेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे संचालक महेंद्र भादेकर, सचिन दाताळ, जयराज कसबे, संपत गायकवाड, भगवान माकणे, मनोज लंगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थिती होते.