22.9 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रचांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

सांगली : प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का बसला आहे. ३.० रिश्टर स्केल भूकंपाचा हा सौम्य धक्का असल्याची नोंद झाली आहे. वारणावतीसह परिसरात पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. वारणावतीपासून ८ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समोर आले आहे.

गेल्या सात दिवसांपासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरण ८५ टक्के इतके भरले आहे. अशा परिस्थितीमध्ये आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

मात्र, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही किंवा वित्तहानी झालेली नाही. त्याचबरोबर चांदोली धरणालादेखील कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे धरण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR