22.5 C
Latur
Wednesday, August 27, 2025
Homeमहाराष्ट्रचाकणकरांच्या मावसभावाचे निधन

चाकणकरांच्या मावसभावाचे निधन

पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मावस भावाचा, बाळराजे माळी यांचे काल रात्री दु:खद निधन झाले. या घटनेमुळे चाकणकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

बाळराजे माळी हे चाकणकर यांचे लाडके मावस भाऊ होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मनमिळाऊ आणि प्रेमळ असल्यामुळे कुटुंबीय व मित्रपरिवारात त्यांना विशेष मान होता. त्यांच्या अचानक निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

रूपाली चाकणकर यांनी आपल्या मावस भावाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे- ‘माझ्या लाडक्या भावाला अखेरचा निरोप’ या भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या दु:खाला शब्द दिले. रक्षाबंधनासारख्या नात्यांच्या आणि स्नेहबंधाच्या सणाच्या दिवशीच ही दु:खद घटना घडल्याने चाकणकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला हा मोठा धक्का बसला आहे. विविध राजकीय, सामाजिक आणि महिला संघटनांकडून बाळराजे माळी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR