26 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeमहाराष्ट्रचाकणकरांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; दोघे अटकेत

चाकणकरांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; दोघे अटकेत

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी आयोगाकडून सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम ७८, ७९, ३५१(३), ३५१(४), ६१(२) इठर तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपी आकाश दिगंबर डाळवे (वय ३०, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे. तर अविनाश बापू पुकळे (वय ३०, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला उरळी कांचन, जि. पुणे येथून अटक करण्यात आली. या दोघांना आज गिरगाव येथील १८ व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी या प्रकरणात एकूण ९ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR